इतिहासHistory01 सप्त-परंपराSapta-parampara02 प्रचितीPrachiti03 परिसरातील देवस्थानेThe Shrines04 चैत्र नवरात्रौत्सवChaitra Navratrotsav05 सेवा परंपराSeva Tradition06 स्तोत्रStotra07 आरतीAarti08 दर्शन गॅलरीDarshan Gallery09 कसे पोहोचावेHow To Reach10 विश्वस्त मंडळTrust11
प्रचिती देणारे जागृत शक्तीपीठ · कोल्ही (गवळी), ता. मोताळा, जि. बुलढाणाA living shakti-peeth · Kolhi (Gawali), Motala, Buldana

श्री क्षेत्र महाबळेश्वर महाराजShree Kshetra Mahabaleshwar Maharaj

सन १४४४ पासूनचा यादवकालीन आध्यात्मिक वारसा. विदर्भ आणि खानदेशाच्या सीमेवर, निसर्गरम्य टेकडीवर वसलेले हे स्थान केवळ ऐतिहासिक वास्तू नाही — लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. A Yadav-era spiritual legacy standing since 1444. On a green hill where Vidarbha meets Khandesh, this is not merely a historic structure but a place lakhs of devotees hold in faith.

श्री महाबळेश्वर महाराज मंदिरातील सजवलेला गाभारा
५८२ वर्षांची अखंड परंपराYears Unbroken
दररोजEvery Day नित्य आरतीNitya Aarti सकाळी ६ वाजता6 in the morning
दर आठवड्यालाEvery Week रविवार महाआरतीSunday Maha Aarti दुपारी १२ वाजता12 noon
मोठा सोहळाMajor Gathering चैत्र नवरात्रौत्सवChaitra Navratrotsav शुद्ध सप्तमी ते पौर्णिमाSaptami to the full moon
ऐतिहासिक पार्श्वभूमीHistorical Background

सन १४४४ पासून अखंडUnbroken Since 1444

हे मंदिर सन १४४४ पासून अस्तित्वात आहे. सुमारे ५८० वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या या स्थानी आजही दैवी शक्तीचा अनुभव येतो.The temple has stood here since 1444. Across some 580 unbroken years, devotees still speak of feeling a divine presence at this place.

श्री महाबळेश्वर महाराजांचा जन्म यादव काळात जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सूपो येथे झाला. लोककल्याणासाठी समर्पित असलेल्या सात संतांच्या मालिकेतील महाराज हे एक दैदीप्यमान रत्न आहेत.Shree Mahabaleshwar Maharaj was born in the Yadav period at Palshi Supo in Jalgaon Jamod taluka. He stands among a line of seven saints devoted to the welfare of ordinary people.

या सात भावंडांनी आपल्या दिव्य शक्तीने आणि वनौषधींच्या ज्ञानाने जनसामान्यांची दुःखे दूर केली. टेकडीवर पोहोचल्यावर परिसरातील शांतता, वारा आणि गावाकडे उघडणारे दृश्य मनाला स्थिर करतात.These seven siblings eased the suffering of villagers through their divine power and their knowledge of forest medicine. At the top of the hill, the quiet air and the open view toward the village give the place its still presence.

महाराष्ट्र शासनाच्या वर्गवारीत हे ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.It is recognised as a Government of Maharashtra Category C pilgrimage site.

  1. यादवकाळYadav Era जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सूपो येथे महाराजांचा जन्म.The Maharaj is born at Palshi Supo in Jalgaon Jamod taluka.
  2. स्थानाची स्थापनाThe Kshetra Is Established कोल्ही (गवळी) येथे देवस्थानाची स्थापना. तेव्हापासून पूजा-अर्चा अखंड सुरू आहे.The shrine is established at Kolhi (Gawali). Worship has continued without a break ever since.
  3. जीर्णोद्धारRenovation श्री सुपडा, विठोबा, महिमा आणि पांडूबा देवकर यांनी स्वखर्चातून मंदिराचा जीर्णोद्धार केला.Shri Supada, Vithoba, Mahima and Panduba Deokar rebuilt the temple at their own expense.
  4. शताब्दी महोत्सवShatabdi Mahotsav जीर्णोद्धाराला शंभर वर्षे पूर्ण. या वर्षीचा चैत्रोत्सव शताब्दी महोत्सव म्हणून साजरा होत आहे.One hundred years since the renovation. This year's Chaitra utsav is kept as the Shatabdi Mahotsav.
संतांची सप्त-परंपराThe Line Of Seven Saints

सात भावंडे, सात क्षेत्रेSeven Siblings, Seven Kshetras

प्रत्येकाचे स्वतःचे क्षेत्र आहे, आणि कोल्ही (गवळी) हे श्री महाबळेश्वर महाराजांचे स्थान.Each has a kshetra of his own; Kolhi (Gawali) is the seat of Shree Mahabaleshwar Maharaj.

थोरले बंधूEldest Brother श्री महासिद्ध महाराजShree Mahasiddha Maharaj श्री क्षेत्र धानोराShree Kshetra Dhanora
क्षेत्रKshetra श्री केशवजी महाराजShree Keshavji Maharaj श्री क्षेत्र कलगावShree Kshetra Kalgaon
जन्मस्थानBirthplace श्री सुपोजी व श्री नावबा महाराजShree Supoji & Shree Navba Maharaj श्री क्षेत्र पळशी सूपोShree Kshetra Palshi Supo
क्षेत्रKshetra श्री विठोबा महाराजShree Vithoba Maharaj श्री क्षेत्र अडोळShree Kshetra Adol
क्षेत्रKshetra श्री बिरोबा महाराजShree Biroba Maharaj श्री क्षेत्र हरसोळाShree Kshetra Harsola
हे स्थानThis Kshetra श्री महाबळेश्वर महाराज, माता गुंडाबाई व बहीणShree Mahabaleshwar Maharaj, Mata Gundabai & His Sister श्री क्षेत्र कोल्ही (गवळी)Shree Kshetra Kolhi (Gawali)
मंदिराचे महात्म्यWhy Devotees Come

भाविकांची प्रचितीWhat Devotees Experience Here

पिढ्यानपिढ्या भाविक जे अनुभव सांगतात, ते त्यांच्याच शब्दांत.These are the experiences devotees have described, generation after generation.

आरोग्य आणि संततीHealth And Children

श्रद्धापूर्वक पाच आरत्यांना उपस्थित राहून विहिरीचे तीर्थ प्राशन केल्यास दुर्धर व्याधींचे निवारण होते आणि निपुत्रिकांना संतती सुख लाभते, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे.Devotees hold deeply that attending five aartis with faith and drinking the teerth from the temple well relieves stubborn illness, and that the childless are granted children.

सर्पदंश निवारणRelief From Snakebite

या परिसरात सर्पदंश झालेली व्यक्ती मंदिरात येताच विषमुक्त होते. महाराजांच्या कृपेने येथे आजवर सर्पदंशामुळे कोणाचेही प्राण गेलेले नाहीत.A person bitten by a snake in this area is said to be freed of the venom on reaching the temple. By the Maharaj's grace, no life has ever been lost here to snakebite.

ग्रामरक्षकGuardian Of The Village

पांढऱ्या शुभ्र अश्वावर स्वार होऊन, पारंपरिक वेशात महाराज रात्री गावाचे रक्षण करतात, असा अनुभव अनेक ग्रामस्थ आजही सांगतात.Many villagers still describe the Maharaj riding out at night on a white horse in traditional dress, keeping watch over the village.

भाग शेज — ईश्वरी कौलBhag Shej — Asking The Deity

कोणत्याही शुभ कार्याचा संकल्प करण्यापूर्वी येथे ‘कौल’ घेण्याची प्रथा आहे.Before undertaking anything auspicious, it is the custom here to ask for a kaul.

उजवा कौल — कार्यसिद्धीRight — go ahead डावा कौल — सावधगिरीLeft — take care

चंद्रभागेच्या तीरावरीOn The Bank Of The Chandrabhaga

चोरांनी घेरलेल्या भक्तांनी आर्त स्वरात हाक दिली, आणि क्षणात शुभ्र वेषातील तीन पुरुष प्रकट झाले — असा अनुभव स्तोत्रात नोंदवला आहे.Devotees surrounded by thieves called out in distress, and three figures in white are said to have appeared at once — an account recorded in the stotra.

किन्होळ्याची अंगठीThe Ring From Kinhola

हरवलेल्या सोन्याच्या अंगठीसाठी ‘उजवा भाग’ मिळाला, आणि आठ महिन्यांनी ती अंगठी सापडली — भक्तांच्या श्रद्धेतील एक स्मरणीय प्रसंग.A right-hand kaul was given for a lost gold ring, and eight months later it was found — a moment devotees still recount.

“संकटाच्या अंधारात मार्ग दाखवणारा दिव्य प्रकाशझोत म्हणजे श्री क्षेत्र कोल्ही!”“In the darkness of trouble, Shree Kshetra Kolhi is the beam of light that shows the way.”

२०२० च्या कोरोना महामारीत कोल्ही गावातील एकही भक्त या आजाराने दगावला नाहीThrough the 2020 pandemic, not one devotee of Kolhi village was lost to the illness
मंदिर परिसरWithin The Premises

एका फेरीत सर्व देवस्थानांचे दर्शनA Walk Through The Shrines

मुख्य गाभाऱ्यासोबत टेकडीवर आणखी पूजनीय स्थाने आहेत.The main sanctum shares the hilltop with several other sacred spaces.

श्री महाबळेश्वर महाराजMahabaleshwar Maharaj

मुख्य गाभारा. दररोज सकाळी ६ वाजता नित्य आरती, रविवारी दुपारी १२ वाजता महाआरती.The main sanctum. Nitya aarti daily at 6 AM, Maha Aarti at noon on Sunday.

श्री माता गुंडाबाईShree Mata Gundabai

महाराजांची माता. स्तोत्रात ‘माता गुंडाबाई पावन’ असा तिचा उल्लेख येतो.The Maharaj's mother, invoked in the stotra as Mata Gundabai.

विठ्ठल रुक्मिणी मंदिरVitthal Rukmini

भागवत सप्ताह आणि कीर्तन सोहळ्याचे केंद्र.The heart of the Bhagwat Saptah and the nightly kirtan.

आदिशक्ती मुक्ताबाईAadishakti Muktabai

नवरात्रीत नऊ दिवस विशेष पूजा आणि आरती.Nine days of special puja and aarti through Navratri.

शिव मंदिरShiv Mandir

श्रावण सोमवार आणि महाशिवरात्रीला अभिषेक.Abhishek on Shravan Mondays and Mahashivratri.

मंदिराची विहीरThe Temple Well

या विहिरीचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन केले जाते.Water from this well is taken as teerth.

चैत्र पौर्णिमाChaitra Pournima
आमचा सर्वात मोठा सोहळाOur Largest Gathering

चैत्र नवरात्रौत्सवChaitra Navratrotsav

चैत्र शुद्ध सप्तमी ते पौर्णिमेपर्यंत भव्य उत्सव — बरोबर नऊ दिवस. या नऊ दिवसांत रामनवमी येते आणि पौर्णिमेला हनुमान जयंती. पुणे, मुंबईत स्थायिक झालेली सगळी मंडळी या दिवसांत गावाकडे परत येतात.The great utsav runs from Chaitra Shuddha Saptami to the full moon — nine days exactly. Ram Navami falls within them, Hanuman Jayanti on the Pournima itself. Families settled in Pune and Mumbai all return to the village for it.

  • उत्सवाचा प्रारंभThe Utsav Opensभागवत सप्ताहाचा शुभारंभ आणि मंदिर परिसरात यात्रा सुरू.The Bhagwat Saptah begins and the jatra fills the premises.
  • भागवत सप्ताह व कीर्तनBhagwat Saptah & Kirtanदिवसा भागवत कथा, रात्री कीर्तन. टेकडीवरचा परिसर टाळ-मृदंगाच्या आवाजाने भरून जातो.Bhagwat katha by day, kirtan after dark, the hilltop carrying taal and mridang.
  • पौर्णिमेची महाआरतीPournima Maha Aartiपहाटे चार वाजता महाआरतीने नवव्या दिवसाची सुरुवात, आणि सप्ताहाची सांगता.The ninth day begins in the dark with the Maha Aarti, and the Saptah is brought to its close.
  • आरती व महाप्रसादAarti & Mahaprasadदुपारच्या आरतीनंतर वरण-बट्टी-रोडगे या पारंपरिक महाप्रसादाचे वितरण.After the midday aarti, the traditional mahaprasad of varan, batti and rodge is served.
  • पालखी सोहळा व दिंडीPalkhi Sohla & Dindiटाळ-मृदंगाच्या तालावर पालखी आणि दिंडी गावातून निघते.The palkhi and dindi set out through the village.
  • काठी उत्सव व बारा गाड्याKathi Utsav & The Twelve CartsकळसPeakकाठी उत्सव आणि ‘बारा गाड्या ओढण्याचा’ रोमांचकारी कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो भाविक जमतात.Thousands gather for the Kathi Utsav and the stirring pulling of the twelve carts.
  • कुत्रा जेवणKutra Jevanभाविक देवासमोर दूध-भात ग्रहण करून नवस पूर्ण करतात. ही आमच्या मंदिराची स्वतःची परंपरा.Devotees fulfil their navas by taking milk and rice before the deity — a tradition particular to this temple.
सेवा परंपराThe Tradition Of Service

५८० वर्षांची निशुल्क सेवा580 Years Of Unpaid Service

५८२ वर्षे अखंड पूजा-अर्चा
सन १४४४ ते आजतागायत
Years of unbroken worship
1444 to this day

सन १४४४ पासून हटकर समाजातील ‘देवकर कुटुंबीय’ या देवस्थानाची पूजा-अर्चा आणि व्यवस्थापन अत्यंत निष्ठेने आणि निशुल्क सांभाळत आहेत.Since 1444, the Deokar families of the Hatkar community have carried out the worship and running of this shrine — with great devotion, and without payment.

ही सेवा परंपरा आणि देवकर मंडळींचा निस्वार्थ भाव पाहून, १९२६ च्या जीर्णोद्धाराच्या वेळी ग्रामस्थांनी व भाविकांनी ठरावानुसार हा सेवेचा मान त्यांच्याकडेच कायम ठेवला — जो आजही तसाच आहे.Seeing that long service and the selflessness behind it, at the 1926 renovation the villagers and devotees passed a resolution keeping the honour of that seva with the same families — where it remains today.

  • १९२६ चा जीर्णोद्धार स्वखर्चातून केलाThe 1926 renovation was funded by
  • श्री सुपडा देवकरShri Supada Deokar
  • श्री विठोबा देवकरShri Vithoba Deokar
  • श्री महिमा देवकरShri Mahima Deokar
  • श्री पांडूबा देवकरShri Panduba Deokar
आध्यात्मिक महिमाThe Spiritual Glory

श्री महाबळेश्वर महाराज स्तोत्रShree Mahabaleshwar Maharaj Stotra

बावन्न ओव्यांचे संपूर्ण स्तोत्र. शयनी-भोजनी स्मरण करावे अशी भक्तांची श्रद्धा.The complete stotra in fifty-two verses, kept in remembrance morning and night.

॥ श्री महाबळेश्वर महाराज स्तोत्र ॥॥ Shree Mahabaleshwar Maharaj Stotra ॥

बावन्न ओव्याFifty-two verses

जय जय श्री महाबळेश्वरा, देवाधिदेवा तु सर्वेश्वरा ।
भक्तांच्या रक्षणासाठी, धावून येसी दयाघना ॥१॥

कोल्ही गिरीवरी नांदसी, जागृत शक्तीपीठ महान ।
भक्तांच्या हृदयामध्ये, तुझे अखंड अधिष्ठान ॥२॥

यादवकाळी अवतार धरी, लोककल्याणासाठी ।
वनौषधीच्या दिव्य ज्ञानाने, दुःख हरिले जनांचे ॥३॥

पळशी सूपो जन्मभूमी, संतपरंपरेचा अभिमान ।
सात संतांच्या तेजामध्ये, उजळला महाराष्ट्र महान ॥४॥

धानोरा क्षेत्री महासिद्ध, थोरले बंधू दिव्य महान ।
कलगावी केशवजी नांदे, भक्तिभावाचे अधिष्ठान ॥५॥

पळशी सूपो सुपोजी-नावबा, संत तेजोमय ज्ञानी ।
अडोळ नगरी विठोबा नांदे, कृपादृष्टी कल्याणी ॥६॥

हरसोळा क्षेत्री बिरोबा, भक्तांचे रक्षण करती ।
कोल्ही नगरी महाबळेश्वर, कृपाछाया धरती ॥७॥

माता गुंडाबाई पावन, भगिनी भक्तिरूपा ।
संतपरंपरा तेजाळली, दैवी कृपेच्या स्वरूपा ॥८॥

कोल्ही नगरी पवित्र झाली, चरणस्पर्शे तुझ्या देवा ।
गिरीवरी हे शक्तीपीठ, भक्तरक्षणासाठी ठेवा ॥९॥

१०

पांढऱ्या शुभ्र अश्वावरी, रात्री ग्रामरक्षण करसी ।
भक्तांच्या संकट काळी, धावून सहाय्य करसी ॥१०॥

११

रविवारच्या दिवशी देवा, असंख्य भक्त येती ।
आरती, भजन, नामस्मरणे, भक्तिभाव वाहती ॥११॥

१२

वरण-बट्टी-रोडग्याचा, महाप्रसाद पवित्र भारी ।
नवस फेडण्या भक्तजन, चरणी माथा टेकती ॥१२॥

१३

चैत्र यात्रेच्या उत्सवामध्ये, पालखी सोहळा महान ।
काठी उत्सव, बारा गाड्या, पाहती भाविक जन ॥१३॥

१४

पोळा, तान्हा पोळा, नागपंचमी मंगलमय ।
दांडी पौर्णिमा उत्सवात, गाजे तुझे नाम ॥१४॥

१५

तुझ्या विहिरीचे तीर्थ घेता, रोगव्याधी दूर होती ।
निपुत्रिकांच्या घरी देवा, संततीसुख नांदती ॥१५॥

१६

सर्पदंशाचे विष उतरवे, तुझ्या कृपेच्या बळे ।
भक्त म्हणती अनुभवाने, चमत्कार घडे खरे ॥१६॥

१७

उजवा कौल कार्यसिद्धी, डावा सावधगिरीचा ।
ईश्वरी संकेत देसी, भक्तांच्या कल्याणाचा ॥१७॥

१८

देवकरांची सेवा पावन, अखंड वर्षानुवर्षे ।
निस्वार्थ भावे चालवीती, पूजा तुझ्या चरणी ॥१८॥

१९

सुपडा देवकर सेवाभावी, विठोबा भक्त महान ।
महिमा आणि पांडूबा, वाढविती मंदिर मान ॥१९॥

२०

सन चौदाशे चव्वेचाळीस, मंदिर स्थापना झाली ।
सन एकोणीसशे सव्वीस, जीर्णोद्धार घडली ॥२०॥

२१

कोरोनाच्या कठीण काळी, गाव रक्षण केले ।
कृपाछाया धरुनी देवा, भक्त सुखरूप ठेविले ॥२१॥

२२

चंद्रभागेच्या तीरावरी, भक्त संकटात पडले ।
चोरांनी जेव्हा घेरले, भय मनामध्ये दाटले ॥२२॥

२३

“धावा देवा महाबळेश्वरा!” आर्त स्वर उठले ।
क्षणामध्ये तीन पुरुष, शुभ्रवेषी प्रकटले ॥२३॥

२४

सदरा, धोतर शुभ्र पांढरे, टोपी तेजोमय भारी ।
तेज तुझे पाहुनी चोर, पळाले भयभीत होऊनी ॥२४॥

२५

भक्तांच्या त्या डोळ्यांमध्ये, आनंदाश्रू दाटले ।
“स्वतः महाराज धावले”, श्रद्धेचे दीप पेटले ॥२५॥

२६

किन्होळा नगरी भक्त वसंता, श्रद्धेने चरणी आले ।
हरवलेली सोन्याची अंगठी, तुझ्या कृपेने मिळाले ॥२६॥

२७

“उजवी भाग” देऊनी देवा, दिला शुभ संकेत ।
आठ महिन्यांनी सापडली अंगठी, भक्तीचा झाला विजय ॥२७॥

२८

जग म्हणाले “हरवलेले, परत कधी मिळत नाही” ।
पण श्रद्धेच्या सामर्थ्यापुढे, अशक्य काहीच नाही ॥२८॥

२९

माझी मंदमती भगवंता, काय वर्णू तुझा महिमा ।
मी निराधार बालक तुझा, तूच माझा आधार ॥२९॥

३०

तु वांचोनि मार्ग दर्शवि कोण, करी माऊलीये कृपा ।
भवसागरात बुडता देवा, धरसी भक्तांचा हात ॥३०॥

३१

तुज लागो आलो शरण, चुकवी जन्ममरण ।
तुझ्या नामस्मरणे देवा, शुद्ध होई अंतःकरण ॥३१॥

३२

जैसी टिटवी सागराशी, अंत कैसा घेऊ पाहे ।
तैसा तुझा महिमा देवा, वर्णन करणे कठीण ॥३२॥

३३

काशी माझी काशीश्वर, त्र्यंबक तू त्र्यंबकेश्वर ।
पंढरीचा तू पंढरीनाथ, कुरुक्षेत्री जगन्नाथ ॥३३॥

३४

हिमालयाचा बद्रीनाथ, भक्तांचा तू कैवारी ।
चारही वेद वर्णन करती, तुझी महती अपारी ॥३४॥

३५

अनाथांचा नाथ तू, दुःखितांचा आधार ।
अंधास नेत्र, पांगळ्यास पाय, करसी उद्धार ॥३५॥

३६

भक्तांच्या अंतरी नांदसी, दयाघना कृपाळू ।
नाम घेताच संकट जाई, तूच पालनकर्ता ॥३६॥

३७

तुझ्या चरणी ठेविले जीवन, चिंता सारी हरपली ।
भक्तिभावाच्या मार्गावर, आत्मशांती लाभली ॥३७॥

३८

नाम तुझे महाबळेश्वर, अमृताहून गोड ।
जप करिता अंतःकरणी, मिटती दुःखकोड ॥३८॥

३९

कोल्ही गवळी पावन भूमी, भक्तीची गंगा वाहे ।
संतांच्या त्या चरणस्पर्शे, भूमी स्वर्ग ठरे ॥३९॥

४०

सप्तसंतांचा महिमा देवा, वर्णनासी अंत नाही ।
जग कल्याणा अवतरले, संतचि परमदायी ॥४०॥

४१

धानोरा ते हरसोळा, भक्तिमार्ग उजळला ।
पळशी सूपो अडोळ नगरी, संतप्रकाश दरवळला ॥४१॥

४२

कलगाव ते कोल्ही क्षेत्री, दैवी शक्ती नांदे ।
भक्तांच्या प्रत्येक श्वासात, महाबळेश्वर वसे ॥४२॥

४३

श्रद्धा ज्याच्या अंतरी वसे, त्याचे कल्याण होई ।
तुझ्या कृपेच्या वर्षावाने, आनंद जीवनात येई ॥४३॥

४४

भक्त चरणी माथा ठेवुनी, मागती तुझी कृपा ।
दुःख संकट दूर करावे, हीच अंतरी भावना ॥४४॥

४५

नित्य आरतीच्या ज्योतीमध्ये, तेज तुझे दिसते ।
धूप दीप आणि नैवेद्याने, मंदिर पावन होते ॥४५॥

४६

भजन कीर्तन नामघोष, गिरीवर दुमदुमती ।
“हर हर महादेव” म्हणता, भक्तीभाव जागृती ॥४६॥

४७

तुझ्या दर्शनमात्रे देवा, जीवन पावन होते ।
दुःख, दारिद्र्य, रोग सारे, चरणी येता हरते ॥४७॥

४८

तुझ्या नामाचा गजर होतां, भय पळे क्षणात ।
महाबळेश्वर कृपेने देवा, सुख लाभे जीवात ॥४८॥

४९

असंख्य नरनारी सेवा करती, भावभक्ती अंतरी धरुनी ।
जैसी जैसी भक्ती करती, तैसे तैसे फळ देसी ॥४९॥

५०

हि जी स्तुती वाचेल कोणी, शयनी भोजनी स्मरे ।
त्याच्या जीवनातील दुःख, श्री महाबळेश्वर हरे ॥५०॥

५१

आरोग्य, संपत्ती, समाधान, भक्तांसी लाभो नित्यदान ।
कृपाछाया राहो सदैव, चरणी अर्पू जीवन ॥५१॥

५२

अनंत कोटी ब्रह्मांडनायक, भक्तवत्सल दयाघना ।
श्री महाबळेश्वर महाराजा, राखा आम्हा सर्वांना ॥५२॥

॥ इति श्री महाबळेश्वर महाराज आध्यात्मिक महिमा स्तोत्र समाप्त ॥
॥ श्री महाबळेश्वर महाराज प्रसन्न ॥ · ॥ हर हर महादेव ॥
॥ Here ends the Shree Mahabaleshwar Maharaj Stotra ॥
॥ Shree Mahabaleshwar Maharaj Prasanna ॥ · ॥ Har Har Mahadev ॥

दररोज सकाळी ६ आणि रविवारी दुपारी १२Sung Daily At 6 AM And Sundays At Noon

आरतीThe Aarti

आमच्या संस्थानाची स्वतःची आरती, आणि पाठोपाठ शंकराची पारंपरिक आरती.Our sansthan's own aarti, followed by the traditional aarti of Shankar.

श्री महाबळेश्वर महाराज आरतीShree Mahabaleshwar Maharaj Aarti

संस्थानाची आरती · भक्त तुकारामThe sansthan's own aarti · Bhakta Tukaram

जय देव जय देव जय महाबळेश्वरा ।
ओवाळीतो आरती देवा सत्वरा ॥ धृ ॥

रविरावाच्या दिवशी दर्शनाची दाटी ।
अंतरबळी तुम्ही उघडावी ताटी ॥
सकळांचा निरोप सांगा भुजेश्वरा ओ ॥ १ ॥

भगीनी देवा तुझी आहे गुंडाई ।
नाम जपता वाचे मन हर्ष होई ॥
प्रेम तयेंचे लहान थोरा ओवाळी ॥ २ ॥

स्नान संध्या करूनी आटोपीले काम ।
चित्त शुध्द करूनी ओवाळीतो राम ॥
जिवलग भक्ताला देत असे थारा ओ ॥ ३ ॥

देवा महाबळाची आरती नित गावे ।
भक्त तुकाराम सांगें चित्ती समाधान पावे ॥
वेगे धऊनी प्रसंगी येई लवकरा ॥ ४ ॥

॥ जय महाबळेश्वर ॥॥ Jai Mahabaleshwar ॥

लवथवती विक्राळाLavthavti Vikrala

श्री शंकराची पारंपरिक आरती · संत रामदासTraditional aarti of Shri Shankar · Sant Ramdas

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझुळां ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ २ ॥

देवीं दैत्यीं सागरमंथन पैं केलें ।
त्यामाजीं अवचित हलाहल जें उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीलकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ ३ ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ ४ ॥

॥ ॐ नमः शिवाय ॥॥ Om Namah Shivaya ॥

नित्यपाठFor Daily Recitation

श्लोकShlokas

दर्शनापूर्वी किंवा घरच्या पूजेत म्हणण्यासाठी शिवस्तुतीचे तीन श्लोक.Three verses in praise of Shiva, for before darshan or for puja at home.

महामृत्युंजय मंत्रMahamrityunjaya Mantra

ॐ त्र्यम्बकं यजामहे
सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्
मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥

त्रिनेत्र शिवाची आम्ही उपासना करतो, जो सुगंधाने भरलेला आणि पोषण करणारा आहे. काकडी वेलापासून सहज सुटते, तसे आम्हाला मृत्यूच्या बंधनातून मुक्त कर.We worship the three-eyed one, fragrant and nourishing. As a cucumber slips free of its vine, release us from the bond of death.

कर्पूरगौरंKarpuragauram

कर्पूरगौरं करुणावतारं
संसारसारं भुजगेन्द्रहारम् ।
सदा वसन्तं हृदयारविन्दे
भवं भवानीसहितं नमामि ॥

कापरासारखा शुभ्र, करुणेचा अवतार, नागराजाची माळ धारण करणारा — जो सदैव हृदयकमलात वास करतो, त्या भवानीसहित शिवाला मी नमन करतो.White as camphor, mercy embodied, wearing the king of serpents as a garland — to him who dwells always in the lotus of the heart, I bow.

पंचाक्षर स्तोत्रPanchakshara Stotram

नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय
भस्माङ्गरागाय महेश्वराय ।
नित्याय शुद्धाय दिगम्बराय
तस्मै ‘न’ काराय नमः शिवाय ॥

नागराजाची माळ घातलेल्या, त्रिनेत्र, भस्म लेपन केलेल्या महेश्वराला — जो नित्य, शुद्ध आणि दिगंबर आहे, त्या शिवाला नमस्कार.To the one garlanded with serpents, three-eyed, smeared with sacred ash — eternal, pure, clothed in the directions themselves: salutations to Shiva.

वर्षभरThrough The Year

सण मंदिरापासून सुरू होतातEvery Festival Starts At The Temple

प्रत्येक सणाला गावकरी आधी मंदिरात जमतात, आशीर्वाद घेतात आणि मग सण साजरा करतात.For every festival, people gather at the temple first, take the blessing, and only then celebrate.

चैत्रChaitra चैत्र नवरात्रौत्सवChaitra Navratrotsav सप्तमी ते पौर्णिमा — वर्षातील सर्वात मोठा सोहळा.Saptami to Pournima — the largest gathering of the year.
श्रावणShravan नागपंचमीNagpanchami विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.Special religious programmes are held.
श्रावण अमावस्याShravan Amavasya पोळा व तान्हा पोळाPola & Tanha Pola सजवलेले बैल मंदिरासमोर आणून पूजा, आणि लहान मुलांचा तान्हा पोळा.Decorated bullocks are brought before the temple, and the children keep Tanha Pola.
पौर्णिमाPournima दांडी पौर्णिमाDandi Pournima विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.Special religious programmes are held.
आश्विनAshwin नवरात्र व दसराNavratri & Dasara नऊ दिवस आदिशक्ती मुक्ताबाई मंदिरात पूजा.Nine days of puja at the Muktabai shrine.
माघMagh महाशिवरात्रीMahashivratri रात्रभर अभिषेक आणि जागरण.Abhishek and vigil through the night.
छायाचित्रेPhotographs

दर्शन गॅलरीDarshan Gallery

फोटोवर क्लिक करून मोठ्या आकारात पहा.Open any photograph to view it larger.

चैत्र पौर्णिमेची झलकA Glimpse Of Chaitra Pournima इन्स्टाग्रामवर आमची व्हिडिओ रील पहाWatch our reel on Instagram
रील पहा →Watch the reel →
संस्थान सोशल मीडियाSansthan On Social Media

कार्यक्रमांची माहिती इथे मिळेलFollow Along For Every Programme

कार्यक्रम, धार्मिक विधी आणि महोत्सवांची माहिती भाविकांना वेळेत मिळावी म्हणून आम्ही सोशल मीडियावर उपलब्ध आहोत.So that devotees hear about our programmes and festivals in good time, the sansthan posts regularly.

प्रवासGetting Here

दर्शनासाठी अवश्य याCome For Darshan

  • कोल्ही (गवळी), ता. मोताळाKolhi (Gawali), Taluka Motala
    जि. बुलढाणा, महाराष्ट्रDistrict Buldana, Maharashtra
  • आरतीच्या वेळाAarti Timings
    नित्य आरती दररोज सकाळी ६ · महाआरती रविवारी दुपारी १२Nitya aarti daily at 6 AM · Maha Aarti Sunday at noon
  • तीर्थक्षेत्रPilgrimage Site
    महाराष्ट्र शासनमान्य ‘क’ वर्ग · र.नं.ए. १३३३Government of Maharashtra Category C · Reg. A-1333
  • अंतरDistances
    मलकापूर २५ किमी (जवळचे रेल्वे स्थानक) · बोदवड २५ किमी · बुलढाणा ४० किमी · जळगाव ७५ किमीMalkapur 25 km (nearest railway station) · Bodwad 25 km · Buldana 40 km · Jalgaon 75 km
  • एस.टी. बसनेBy ST Bus
    मलकापूर किंवा मोताळ्यापर्यंत बस, तेथून खासगी वाहनाने कोल्ही (गवळी).Bus as far as Malkapur or Motala, then a local vehicle to Kolhi (Gawali).
विश्वस्त मंडळThe Trust

श्री क्षेत्र महाबळेश्वर महाराज संस्थानShree Kshetra Mahabaleshwar Maharaj Sansthan

मंदिराचा कारभार नोंदणीकृत संस्थानामार्फत चालतो. यात्रा, सेवा किंवा कार्यक्रमांबाबत थेट पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल.The temple is run by a registered sansthan. For the yatra, seva or any programme, reach the office bearers directly.

संस्थेचे नावRegistered As श्री महाबळेश्वर संस्थानShree Mahabaleshwar Sansthan कोल्ही (गवळी), ता. मोताळा, जि. बुलढाणाKolhi (Gawali), Motala, Buldana
नोंदणी क्रमांकRegistration No. र.नं.ए. १३३३ बुलढाणा येथे नोंदणीकृतRegistered at Buldana
दर्जाStatus तीर्थक्षेत्र ‘क’ दर्जाCategory ‘C’ Site महाराष्ट्र शासनमान्यGovernment of Maharashtra
  • श्री. जगदेवराव शंकरराव शिंदेShri. Jagdevrao Shankarrao Shinde अध्यक्षPresident 8275285039
  • श्री. रामदास गोविंदा भगतShri. Ramdas Govinda Bhagat उपाध्यक्षVice President
  • श्री. देवराज तुकाराम शिंदे (देवकर)Shri. Devraj Tukaram Shinde (Deokar) सचिवSecretary 8605363406
  • श्री. पुरुषोत्तम रमेश शिंदेShri. Purushottam Ramesh Shinde सदस्यMember 8888243921
  • श्री. वासुदेव सुगदेव शिंदेShri. Vasudev Sugdev Shinde सदस्यMember 9145246668